फादर दिब्रिटोंच्या साहित्याची मुळे त्यांच्या जन्मगावाच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या मातीत आहेत. त्यांची मराठी भाषेची ओज त्यांच्या सुपीक वालुकामय जमिनीच्या पोतात आहे!

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची मराठी साहित्यक्षेत्रातील तपस्या तशी प्रदीर्घ आहे. ती आजकालची नाही. ती सुरू झाली ते धर्मगुरू होण्यापूर्वीपासून. त्याला आता जवळजवळ ६० वर्षे झाली. धर्मगुरू झाल्यानंतरही या साधनेला ते चिटकून राहिले. दिब्रिटो यांची साहित्यिक जडणघडण काही अंशी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत - पुण्यात - झाली. वसईत आल्यावर त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण अशी स्वत:ची लेखनशैली त्यांनी निर्माण केली.......